Hinjawadi : ट्रॅव्हल्स चालकाने पार्सल योग्य ठिकाणी पोहचवले नाही म्हणून चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : ट्रॅव्हल्स बसच्या (Hinjawadi) चालकाने पार्सल म्हणून दिलेले साहित्य योग्य ठिकाणी दिले नाही म्हणून पाच ते सहा जणांनी चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. हे घटना बुधवारी (दि.4) दुपारी दोन वाजता मुंबई बेंगलोर महामार्गावर घडली.

याप्रकरणी मोहनलाल पेमाराम बिष्णोई (वय 40 राजस्थान) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वरून हिंजवडी पोलिसांनी सुजानराम भगवान राम मांजू, दिनेश सुतार, राजू बिष्णोई, रमेश बिष्णोई, रमेश सुतार, हरीश बिष्णोई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Bollywood : कपिल शर्मा, श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी यांना ईडीचे समन्स

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्रवासी बसचे चालक आहेत यावेळी सुजानराम मांजू याचा माल घेऊन जात (Hinjawadi)  असताना फिर्यादी दुपारी दोन वाजता मुंबई बेंगलोर हायवे वर वाकड येथील इंदिरा स्कूल जवळ थांबले. यावेळी आरोपी व त्याचे साथीदार तिथे आले व त्यांनी सोबत दिलेले साहित्य हे योग्य स्टॉप वर का दिले नाही याची विचारणा करत शिवीगाळ केली.

फिर्यादी यांना लाथा बुक्क्याने, लाकडी बॅटने मारहाण करत फिर्यादी यांना जखमी केले. हिंजवडी पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.