Mumbai: हा वेळ सत्कारणी लावण्याची ‘पाठकबाईं’ची शिकवणी

Mumbai: The teaching of 'Pathakbai' to treat this time with hospitality

एमपीसी न्यूज – ‘सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरात अडकून पडले आहेत. पण हा मिळालेला वेळ हा सत्कारणी लावा’, असं ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतल्या पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर म्हणतेय.

मूळची पुण्याची असलेली अक्षया शूटींग निमित्ताने कोल्हापुरात राहायची. पण सध्या ती पुण्यात तिच्या घरी कुटुंबीयांसोबत आहे. लॉकडाउनमधील तिच्या वेळापत्रकाबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘हातात मिळत असलेला वेळ सकारात्मक कामांसाठी घालवायचा प्रयत्न करते. कंटाळा, नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी ते गरजेचं आहे. मी कधी चित्र काढेन असं मला वाटलं नव्हतं पण लॉकडाउनमध्ये मी बऱ्यापैकी चित्रकला शिकलेय. तसंच आईकडून अनेक पदार्थ देखील शिकतेय. आम्ही दोघी मिळून किचनमध्ये काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. याशिवाय मी वाचन, टीव्ही, सिनेमे बघणे यात सध्या वेळ घालवतेय.’

करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग हे लॉकडाउनमध्ये आहे. त्याला करमणूक क्षेत्रदेखील अपवाद नाही. लॉकडाउनच्या काळात टीव्ही मालिकांचं चित्रीकरणही ठप्प आहे आणि आपले आवडते कलाकारही आपापल्या घरात बंद आहेत.

अक्षयाचे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत असल्याने लॉकडाउन काळातही त्यांना कामासाठी बाहेर पडावं लागतं. ‘मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. माझे आई-वडील सरकारी सेवेत आहेत. दोघेही अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांना या संकटकाळात कामासाठी बाहेर पडावंच लागतं,’ असं अक्षयानं सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.