Hardik Joshi: राणादाला ‘हे’ दु:ख आहे, पण तरीदेखील घरी असल्याचा आनंद आहे…

Hardik Joshi: Ranada is sad, but he is still happy to be at home ...

एमपीसी न्यूज – कोल्हापूरच्या मातीतला रांगडा गडी म्हणून ‘राणादा’ म्हणजेच हार्दिक जोशी लोकांच्या घरात पोचला. आणि त्याच्या निष्पापपणामुळे तो लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. मागील तीन ते चार वर्षे मालिकेच्या शूटींगमुळे टीव्ही कलाकार आऊटडोअर शूटींगच्या ठिकाणीच आपला जास्तीत जास्त वेळ घालवत असत.  मात्र सध्या मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे प्रेक्षकांचे लाडके कलाकार देखील घरीच आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’मधील सर्वांचा आवडता राणादा सध्या लॉकडाऊनमध्ये काय करतोय हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. सध्या हार्दिक बोईसर येथे त्याच्या गावी कुटुंबासोबत राहतोय आणि मिळालेला हा वेळ सकारात्मक घालवण्याचा प्रयत्न करतोय.

सध्याच्या त्याच्या दिनक्रमाविषयी बोलताना हार्दिक म्हणाला, ‘सध्या  सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, घरकामात आईला मदत करणे, घरातल्या अंगणात झाडे लावणे, संध्याकाळी घरच्यांसोबत खेळणे, पुन्हा व्यायाम करणे असे माझे शेड्युल आहे. माझे कुटुंबीय मुंबईत असतात, पण मी तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त गेली 4 वर्षे कोल्हापुरात आहे. तीन महिन्यानंतर 2 ते 3 दिवस सुट्टीमध्ये मी मुंबईला घरी यायचो’.

_MPC_DIR_MPU_II

‘त्यामुळे मागील चार  वर्षांत घरच्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. पण आता लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा मी परिवारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतोय. गेली चार वर्षे मी आईच्या हातचं जेवण मिस करत होतो पण आता मी आईच्या हातच्या पोळी भाजीचा पुरेपूर आस्वाद घेतोय. गेले 2 महिने शूटिंग बंद असलं तरीपण मी मिळालेल्या वेळात सिनेमे आणि वेब सिरीज बघतोय. कलाकार म्हणून त्यातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करतोय’.

या दरम्यान घडलेली एक वाईट घटना म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा कुत्रा ‘बडी’ आम्हाला कायमचा सोडून गेला. माझ्यासाठी बडी म्हणजे माझं बाळ होतं. त्याच्या जाण्याचं दुःख असलं तरी देखील त्याच्या शेवटच्या दिवसात त्याच्यासोबत चांगला वेळ घालवता आला याचं समाधान आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.