New Serial on Zee Marathi : आता प्रेक्षक अनुभवणार कोकणी इरसालपणा आणि सातारी हिसका

Now the audience will experience Konkani Irsalpana and Satari Hiska

एमपीसीन्यूज : मागील अडीच तीन महिने बंद असलेली मनोरंजनसृष्टी आता कात टाकून पुन्हा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. काही अटी शर्तींसह चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. मात्र, परवानगी जरी मिळाली असली तरी चित्रीकरण सुरू होण्यासाठी काही काळ जाईल. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या मालिकांचे नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोकणी इरसालपणा आणि सातारी हिसका दाखवणा-या ‘एक गाव भुताचा’ आणि ‘टोटल हुबलाक’ या आणखी दोन नवीन मालिका लॉकडाउनच्या काळात ‘झी मराठी’वर पाहायला मिळणार आहेत.

‘एक गाव भुताचा’या या मालिकेचे लेखन राजू घाग यांनी केले असून यात वैभव मांगले मुख्य भूमिकेत आहेत. सध्या वैभव लॉकडाऊनमध्ये त्याच्या देवरुख येथील कोकणातील घरीच आहे. या मालिकेचे शूटींग तिथेच केले जात आहे.

तर लेखक आणि निर्माता तेजपाल वाघ याने त्याच्या ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील भैय्यासाहेब, टॅलेन्ट आणि राहुल्या या तिघांना घेऊन ‘टोटल हुबलाक’ ही मालिका केली आहे. यातील भैयासाहेब म्हणजे किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल यांचे लग्न काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. हा प्रमोशनचाच भाग होता.

‘टोटल हुबलाक’ ही मालिका १५ जूनपासून रात्री ८.३० वाजता तर ‘एक गाव भुताचा’ ही मालिका १८ जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षक झी मराठीवर पाहू शकतील.

या दरम्यान डिजिटल आशय निर्मितीतून मनोरंजन करणे शक्य असल्याने झी मराठी वाहिनीवर ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’ आणि ‘घरात बसले सारे’ यासारख्या आणखी काही घरच्या घरी चित्रित केलेल्या मालिकांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.

याशिवाय काही जुन्या क्लासिक मालिकांचे पुनर्सादरीकरण सुरु आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.