Pimpri : पालिका प्रशासनाचे झोपडपट्टी परिसरात दुर्लक्ष, गणेश आहेर यांचा आरोप

Municipal administration neglects slum areas alleges Ganesh Aher.

एमपीसी न्यूज – झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव होण्यास सूरूवात झाली आहे. झोपडपट्टी परिसरात महानगरपालिका प्रशासनाकडे विशेष लक्ष घालण्याची मागणी करून देखील प्रशासन लक्ष घालत नसल्याचा आरोप गणेश आहेर यांनी केला आहे.

दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रसार झोपडपट्टी परिसरात वाढत असताना देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन माञ उदासीनच असल्याचे चित्र आहे.

पिंपरीतील भाटनगर, चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी परिसरात करोना  बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. रूग्णांची संख्या दिवसेेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने झोपडपट्टी परिसराकडे गंभीर्यांने बघण्याची गरज आहे असे गणेश आहेर यांनी प्रसिध्दीपञकात म्हटले आहे.

पालिका प्रशासन दाखवत असलेल्या उदासीनते मुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने या आजाराला आळा घालण्यासाठी तात्काळ झोपडपट्टी परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत आहेर यांनी व्यक्त केले आहे.

झोपडपट्टीत जागे अभावी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे पलिका प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर  होणा-या प्रकोपाला पालिका जबाबदार असेल असे मत मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.