Crime News : वारजेत ब्लेडने वार करून ज्येष्ठ महिलेचा खून

एमपीसी न्यूज – पुण्यातील वारजे परिसरात ब्लेडने वार करून एका ज्येष्ठ महिलेचा खून करण्यात आला.मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.अज्ञात चोरट्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुलक्षणा सुभाष डांगे (वय 65, रा. सुगम विश्व कॉलनी, आकाश नगर वारजे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी सुलक्षणा डांगे यांचा जावई आणि नात कामासाठी गेले होते.त्यानंतर त्या एकट्याच घरात होत्या. विश्व इमारतीतील पहिल्या मजल्यावर त्या राहत होत्या. दुपारच्या सुमारास पाणी भरण्यासाठी त्या खाली आल्याचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यानंतर मात्र त्या कुणालाच दिसल्या नाहीत.

सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्या घराचे दार ढकलले असता त्या रक्ताच्या थरोळात पडल्या होत्या.त्यानंतर वारजे पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.त्यांच्या अंगावरील सोन्याची दागिने आणि घरातील काही पैसे चोरीला गेल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे चोरीला प्रतिकार केल्याने त्यांचा खून केला असण्याची शक्यता व्यक्त केली. वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.