Jeevan Gaurav Award : संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2020-21 व 2021-22 या वर्षांसाठीचे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार (Jeevan Gaurav Award) जाहीर करण्यात आले आहेत.

सन 2020 – 21 साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला आहे.

सन 2020 – 21 साठीचा संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव (Jeevan Gaurav Award) पुरस्कार दिप्ती भोगले यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

Pune Transgenders : पुणे जिल्हा न्यायालयात ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बनवण्यात येणार!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.