Pune Transgenders : पुणे जिल्हा न्यायालयात ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बनवण्यात येणार!

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा न्यायालयात ट्रान्सजेंडर (Pune Transgenders) समुदायासाठी विशेष स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून वकील आणि कार्यकर्ते प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे स्वतंत्र स्वच्छतागृहांची मागणी करत होते आणि अखेर त्याबाबतचा निर्णय झाला.

ट्रान्सजेंडरच्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑफ ट्रान्सजेंडर ऍक्ट 2019 नुसार पुणे जिल्हा न्यायालयात स्वतंत्र स्वच्छतागृहांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती मानवाधिकार कार्यकर्ते अॅड विकास शिंदे यांनी दिली.

ट्रान्सजेंडर्सबाबत (Pune Transgenders) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे सिद्ध झाले आहे, की हा आजार किंवा विकार नसून स्त्रिया आणि पुरुषांप्रमाणेच ट्रान्सजेंडर असणे पूर्णपणे नैसर्गिक आहे.

त्यानंतर समाजाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा केला आहे. समाजातील ट्रान्सजेंडर समुदायाबद्दलचे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांना आवश्यक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहाचा भाग बनण्यासाठी आणि राष्ट्रात प्रतिष्ठित होण्यासाठी मदत करणे ही समाजाची जबाबदारी आहे.

Kudalwadi News : महापालिकेकडून चक्क नाल्यावर ‘एसटीपी’ची उभारणी!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.