Nashik Corona Update : नाशिकमध्ये 6 हजार 379 रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 1 लाख 22  हजार 167  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6 हजार 379  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनामुळे आत्तापर्यंत 2 हजार 166  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 141, चांदवड28, सिन्नर92, दिंडोरी 42, निफाड 181, देवळा 23 नांदगांव 135, येवला 77, त्र्यंबकेश्वर 42, सुरगाणा 7, पेठ 1, कळवण 21, बागलाण 50, इगतपुरी 25, मालेगांव ग्रामीण 39  असे एकूण 904  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 4 हजार 924, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 489  तर जिल्ह्याबाहेरील62  असे एकूण 6 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 30  हजार  712 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 95.31 टक्के, नाशिक शहरात 93.02 टक्के, मालेगावमध्ये 88.32  टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 91.81  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 93.46 इतके आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.