Nashik Corona Update : नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 97.10 टक्के

एमपीसीन्यूज : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत (Nashik District Genral Hospital) आज, शनिवारी सकाळी 11  वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार 153  कोरोना ( corona ) बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1 हजार279 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 37  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार ( Dr. Anant Pawar) यांनी दिली आहे.

सध्या नाशिक ग्रामीणमध्ये 70, चांदवड 20, सिन्नर 90, दिंडोरी 20, निफाड 72, देवळा 8, नांदगांव 21, येवला 27, त्र्यंबकेश्वर 17, सुरगाणा ००, पेठ 7 , कळवण 13, बागलाण 20, इगतपुरी 3, मालेगांव ग्रामीण 19, असे एकूण 407 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.

तसेच नाशिक महानगरपालिका ( Nashik Municipal) क्षेत्रात 733 मालेगांव महानगरपालिका ( Malegaon Municipal Corporation) क्षेत्रात 129 तर जिल्ह्याबाहेरील 10 अशा एकूण 1 हजार 279  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 469  रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.39 , टक्के, नाशिक शहरात 97.68  टक्के, मालेगावमध्ये 93.57 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण  94.49 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.10 इतके आहे.

आजपर्यंत नाशिक ग्रामीण 801  नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 1 हजार 10, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 176  व जिल्हा बाहेरील50  अशा एकूण 2 हजार 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.