Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत मारुती मंदिरात मुस्लिमांना रोजा ईफ्तारचे आयोजन

एमपीसी न्यूज- पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व साखळीपीर तालिम राष्ट्रीय मारुती मंदीर आयोजित हिंदुंकडून मुस्लिमांना रोजा ईफ्तार ह्या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि.15) सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन रविंद्र माळवदकर व भाई कात्रे यांनी केले आहे. हिंदुंकडून मुस्लिमांचा रोजा ईफ्तार ह्या कार्यक्रमाचे हे 35 वे वर्ष असून साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदीर, नाना पेठ येथे त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मनसे अद्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे 3 मे पर्यंत हटविण्यात यावे हे मविआ सरकारला अल्टिमेटम दिल्याने राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना राष्ट्रवादी पक्षाने मात्र हिंदू मंदिरातच मुस्लिम नागरिकांना रोजा इफ्तार देण्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने मात्र थेट हनुमान मंदिरातच इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने हा वाद येणाऱ्या काळात कोणते वळण घेईल ह्याची शक्यता मात्र वर्तवता येत नाही तसेच सोशल मीडियावर अनेक संमिश्र अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

दरम्यान ह्या कार्यक्रमाचे आयोजन शिवानी माळवदकर यांनी केले असून इफ्तार रोजासाठी प्रमुख उपस्थिती श्रीपाल सबणीस (ज्येष्ठ विचारवंत) प्रशांतदादा जगताप (अध्यक्ष पुणे शहर रॅां.कॅां पार्टी) पि.ऐ ईनामदार (शिक्षण महर्षी) रामनाथ पोकळे (अप्पर पोलिस आयुक्त) राजेंद्र डहाळे (अप्पर पोलिस आयुक्त) प्रियांका नारनवरे (पोलिस उपायुक्त) सतीश गोवेकर (सहाय्यक पोलिस आयुक्त) हे उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.