Pimple Gurav Crime News : किरकोळ वादातून सख्या भावांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून सख्या भावांवर खुनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैदवस्ती काझी केटर्स, पिंपळे गुरव, पुणे येथे बुधवारी (दि.13) ही घटना घडली. या प्रकरणी चौघांविरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 326, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

साहिल लोखंडे, विशाल लोखंडे, युवराज लोखंडे, किशोर लोखंडे (सर्व रा. वैदवस्ती काझी केटर्स, पिंपळे गुरव, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

निखील अंबादास पडळकर (वय 20, रा. सुजदर्शन नगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील पडळकर आरोपी विशाल लोखंडे याच्यासोबत बोलत उभा राहिला होता. त्यावेळी ‘तु येथे भाड्याने राहतो तुला मोठेपणा करायची हौस आहे’, असे आरोपी विशाल निखील याला म्हणाला. निखीलने हा घडला प्रकार विशालच्या वडीलांना सांगितला. त्यानंतर निखील हा वैदवस्ती येथे थांबला आरोपी साहिल, युवराज व किशोर त्याठिकाणी आले व त्याला शिवीगाळ करू लागले.

फिर्यादीने त्याचा भावाला फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले. आरोपीने फिर्यादीच्या भावाच्या कानाखाली मारली. तसेच, दुकानातून चाकू आणून फिर्यादी निखीलच्या अंगावर वार केले. फिर्यादीच्या भावाला देखील वार करून सिमेंटच्या ब्लॉक डोक्यात मारले. आरोपी किशोर याने फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ दोघांना दगड मारून जखमी केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.