Railway News : रेल्वे तिकीट बुक करताना आता ‘ही’ माहिती भरण्याची गरज नाही

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या काळात रेल्वे विभागाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले होते; मात्र कोरोना साथ ओसरल्यानंतर निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन रेल्वे सेवा पूर्वपदावर आणली जात आहे. कोरोना काळात रेल्वे तिकीट बुक करताना ज्या ठिकाणी जायचं आहे (गंतव्य स्थान / डेस्टिनेशन) त्याची माहिती द्यावी लागत असे. मात्र आता ती माहिती देण्याची आवश्यकता नाही. रेल्वेने आता गंतव्य स्थान नमूद करण्याची गरज नसल्याचे जाहीर केले आहे.

बुधवारी (दि. 13) रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाईन तिकीट काढताना आता गंतव्य स्थान टाकण्याचा पर्याय काढण्यात आला आहे. रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंगचे काम आयआरसीटीसी ही कंपनी पाहते. आयआरसीटीसीने आपल्या मोबाईल अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळावरून गंतव्य स्थान नमूद करण्याचा पर्याय अपडेट केला आहे.

यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वेने महत्वाची भूमिका बजावली आहे. विशेष रेल्वेच्या माध्यमातून नागरिकांची ने-आण रेल्वेने केली आहे. दरम्यान रेल्वेने तिकीट बुकिंग आणि रेल्वे प्रवासात बदल केले होते. जनरल डबे काढून केवळ आरक्षित डब्यांचा समावेश केला होता. आता त्याबाबतही निर्णय घेऊन काही रेल्वेला जनरल डबे जोडले जात आहेत. तसेच पॅसेंजर आणि डेमू, इमू रेल्वे देखील सुरु केल्या जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.