Akurdi : आधार कार्ड अपडेट, नवीन आधारकार्ड काढणे,  मोबाईल नंबर लिंक करणे कॅम्पचा 1100 नागरिकांनी घेतला लाभ

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांच्यातर्फे कॅम्पचे आयोजन

एमपीसी न्यूज –  आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील तर असे आधार कार्ड नव्याने अपडेट करणे बंधनकारक झाले आहे. आधार अपडेट न केल्यास ते बंद होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि पुणे शहर जिल्हा प्रभारी विशाल बाळासाहेब काळभोर यांनी काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, मोहननगर,  चिंचवड येथे आठ दिवसीय आधार कार्ड अपडेट, नवीन आधारकार्ड काढणे, आधारकार्ड नाव, पत्ता दुरुस्ती करणे, मोबाईल नंबर लिंक करणे यासाठी कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पमध्ये 1 हजार 75 नागरिकांनी लाभ घेतला.

PMRDA : पेठ क्रमांक 12 मधील पात्र लाभार्थ्यांना 6 जून पासून मिळणार सदनिकांचा ताबा

काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, मोहननगर,  (Akurdi)  चिंचवड भागातील  नागरिकांसाठी आठ दिवस आधार कार्ड अपडेट कॅम्पचे आयोजन केले होते. यावेळी विशाल काळभोर आणि त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल काळभोर म्हणाले, आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक बदलतात. आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदीचे अद्यावतीकरण आवश्‍यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर 10 वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्‍यक करण्यात आले आहे. तसेच आधार अपडेट न केल्यास ते बंद होण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे आधार कार्ड काढून 10 वर्षे झालेल्या  नागरिकांचे आधार रद्द होऊन त्यांची भविष्यकाळातील गैरसोय टाळावी, यासाठी प्रभागातील नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेटसह विविध बाबींसाठी कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पसाठी 1280 जणांनी नोंदणी केली होती तर 1 हजार 75 नागरिकांनी सहभाग घेतला.

याबाबत विशाल काळभोर म्हणाले की, गेली 8 दिवस काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, मोहननगर,  चिंचवड (Akurdi) भागातील नागरिकांसाठी नवीन आधारकार्ड काढणे, आधारकार्ड नाव, पत्ता दुरुस्ती करणे, मोबाईल नंबर लिंक करणे, आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करणे, आधारकार्डला मतदान कार्ड लिंक करणे, आधारकार्डचा फोटो बदलणे, जन्म तारीख पूर्ण टाकण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा तब्बल 1 हजार 75 नागरिकांनी लाभ घेतला.

Maharashtra News : मुंबई विमानतळावर पकडले 6.2 कोटी रुपये किमतीचे 10 किलो सोने

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.