NCP : देव देव्हाऱ्यात नसेल, तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भूमिका

एमपीसी न्यूज – शरद पवार साहेबांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर (NCP) या विचारधारेमुळे आम्ही राजकारणात आलो. आता देवच देव्हाऱ्यात नसेल तर आम्ही  सामूहिक राजीनामे देवू अशी भूमिका पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी घेतली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांची भूमिका आहे. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख म्हणाले, सध्या देशातील, महाराष्ट्रातील परिस्थिती कठीण आहे.

देशातील अल्पसंख्याक समाज आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. पवार साहेब ही अल्पसंख्याक समाजाची शेवटची आशा आहे. जर शरद पवार साहेबांनी राजीनामा परत घेतला नाही. तर, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या समवेत आम्ही पिंपरी-चिंचवड शहरातील  युवक पदाधिकारी सामूहिक राजीनामे  देणार आहोत.

शरद पवार साहेब यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय आम्ही राजकीय जीवनात काम करू शकलो नसतो. महिला आरक्षणासाठी त्यांनी ज्या काही तरतुदी करून ठेवल्या. त्या तरतुदींमुळेच आज अनेक महिला भक्कमपणे राजकारणात काम करत आहेत. साहेबांनी घेतलेला निर्णय कदाचित त्यांच्या दृष्टीने योग्य असेलही मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून हा निर्णय कोणालाही मान्य नाही.

Maval : इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे श्रमदान विद्यादानाच्या कार्यक्रमाचे आयोजन

किंबहुना कार्यकर्ते या निर्णयाचा विचार देखील करू शकत नाही. (NCP) त्यामुळे पवार साहेबांनी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. पुढील काळात त्यांची भक्कम साथ राजकीय दृष्टीने सर्वांनाच हवी आहे. त्यांच्याशिवाय पुढील मार्गक्रमण करणे अतिशय खडतर आहे असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे, असे महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.