Maval : इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे श्रमदान विद्यादानाच्या कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – इंडीयन मेडीकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी (IMAPCB ) शाखेच्या वतीने मावळातील गोडुंब्रे या गावी श्रमदान व विद्यादानाचे कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.30 मे रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले होते.

यावेळी सरपंच निशा गणेश सावंत, दिलीप कामत, प्रभाकर बुरटे, गोडुंबरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने नूतनीकरण केलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामप्रबोधिनीचे भताने यांनी प्रस्तावित केले. सुनील मुथियानी यांनी आओ गाव चले या अंतर्गत सुरू केलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. तसेच उद्घाघाटनानंतर मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचा 175 ग्रामस्थांनी लाभ घेतला. तसेच शिबिरासाठी वेगवेगळ्या विषयातील तीस तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. यावेळी  औषध वाटप देखील करण्यात आले. सचिव‌ टोनगांवकर, खजिनदार विकास मंडलेचा यांनी संयोजन केले.

Kalewadi : मंगेश नढे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

मिलिंद सोनवणे, मनीषा पाटील , संजय देवधर, संजीव दात्ये, शुभांगी कोठारी, बायना सुतार, मयुर पुरंदरे , संतोष माने , दीपक शिंदे, हेमंत शिरसगर, दीपाली टोनगांवकर, सुवर्णा दिवाण ,‌ मुगधा मार्कंडेय , शाळिग्राम भंडारी, रिहा मुथीयान, प्रदीप नाईक , प्रताप फरांदे, विजय सातव , सुहास माटे यांनी योगदान दिले.

प्राथमिक आरोग्य केंद्र अडलेचे आरोग्य अधिकारी सूर्यवंशी व पुणे जिल्हा नेत्र चिकित्सक प्रकाश रोकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.