Pimpri: महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे विनोद नढे, उपमहापौरपदासाठी विनया तापकीर यांचे अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. महापौरपदासाठी विनोद नढे यांचा तर उपमहापौरपदासाठी च-होलीच्या नगरसेविका विनया तापकीर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे.
 
महापालिकेत भाजपचे 77, राष्ट्रवादी काँग्रेस 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि मनसे 1 असे 128 नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजपचे पाशवी बहुमत आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडणून येण्यास कोणतीही अडचण नाही. परंतु, निवडणूक बिनविरोध होऊ नये असा राष्ट्रवादीचा निर्णय आहे. त्यासाठीच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

 
दरम्यान, भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या सव्वा वर्षासाठी महापौरपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महापौरपदासाठी नगरसेवक श्याम लांडे तर उपमहापौरपादासाठी नगरसेविका निकिता कदम यांचा अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यावेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली होती. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.