NCP : आता निवडणूक विकासावर नव्हे विचारावर होणार – जयंत पाटील

एमपीसी न्यूज – आता निवडणूक विकासावर नाही(NCP) तर विचारावर होणार आहे. तुम्ही कोणत्या विचारांच्या मागे आहेत हे पाहून लोक मतदान करतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तसेच अडचणीत आल्यानेच आमचे काही लोक दुसरीकडे गेल्याचेही ते म्हणाले.

अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक दिवंगत डॉ. अशोक शीलवंत यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून आज सोमवारी पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे विविध पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पाटील बोलत होते.

यावेळी डॉ. अशोक शिलवंत धम्मदीप पुरस्कार’ ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांना, डॉ. अशोक शिलवंतसमाजभूषण पुरस्कार माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड व बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेव डोळस यांना, विद्याभूषण पुरस्कार इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे तर स्वाती सामक यांना काव्यभूषण पुरस्कार देण्यात आला.

Pune : 14 ऑक्टोबर रोजी ‘ गजल के साये में कार्यक्रम

आमच्या पक्षातील काही लोक तिकडे गेले आहेत. काहीजण संकटात(NCP) गेल्यामुळे अडचणीत गेले. अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले ही परिस्थिती आहे. परिस्थिती बदलत असते. आता खुर्चीत बसलेला निर्णय देत नाही. दुसराच कोण तरी निर्णय लिहून देतो आणि तो खुर्चीतील व्यक्ती वाचुन दाखवतो. त्यामुळे आता चिन्ह, पक्ष न बघता लोक विचार बघून मते करतील, असेही पाटील म्हणाले.

सुलक्षणा शिलवंत-धर यांना विधानसभेचे तिकीट देखील आमच्या पक्षाने दिले होते. पण, त्यांचे तिकीट हिसकावून घेण्यात आले. पण, त्या पक्षाच्या शिस्तीत राहिल्या. पक्षाचे काम करत आहेत. परिस्थिती बदलली तरी त्यांनी पवार साहेब यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला, असेही पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.