Pune : कार्यानुभव देणारी शिक्षण प्रणाली आवश्यक – प्रा. अरविंद गुप्ता

एमपीसी न्यूज – कामावर आधारित शिक्षण प्रणाली (Pune) कौशल्य शिकवते, आत्मसन्मान,आत्मविश्वास वाढवते, त्यामुळे या शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक प्रा. अरविंद गुप्ता यांनी केले.

ग्रामीण विकासासाठी शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञानाचा ध्यास घेतलेल्या पाबळ (जि. पुणे) येथील विज्ञानाश्रमचा प्रवास पुस्तकरूपात आला आहे. हा प्रवास उलगडून दाखविणाऱ्या ‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ या पुस्तकाचे प्रकाशन अरविंद गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

‘उद्दिष्ट चांगले असेल तर प्रतिकूल परिस्थितीत काम करून चांगले शिक्षण घेता येते. भोवतालचे प्रश्न सोडविता येतात, हे विज्ञान आश्रमच्या उदाहरणावरून दिसून येते, असेही प्रा. गुप्ता यांनी सांगितले. विज्ञान आश्रमची यश कथा पुस्तक रुपात आली. ही महत्वाची गोष्ट असून हे पुस्तक हिंदीत देखील यावे यासाठी मी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.

विज्ञानाश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी लिखित हे पुस्तक समकालीन प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन कार्यक्रमाला ज्येष्ठ संशोधक डॉ .अरविंद गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम जे.पी नाईक सेंटर फॉर एज्युकेशन, कोथरूड येथे झाला.

विज्ञानाश्रम स्थापनेला 40 वर्ष झाल्याने त्याबाबतची माहिती, प्रेरणा आणि योगदान सर्वांपर्यंत जावे, या हेतूने हे पुस्तक लिहिल्याची माहिती डॉ.योगेश कुलकर्णी यांनी दिली. यावेळी विज्ञान शिक्षणावर परिसंवाद आयोजित करण्यात आले. त्यात अरविंद गुप्ता, विजय कुमार, डॉ योगेश कुलकर्णी, वंदना अत्रे, शोभना भिडे, गौरी कानेटकर, अनिल गाडे, कल्याणी चावली आदी सहभागी झाले.

Chinchwad: कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणाऱ्या आरोपीला अटक

डॉ. योगेश कुलकर्णी म्हणाले,’, ग्रामीण भागाच्या गरजा जशा बदलत आहेत, विज्ञान आश्रम चा अभ्यासक्रम तसतसा बदलत गेल्या आहेत.आता पाण्याच्या पुनर्वापराच्या तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे.तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांना मिळावा असाच आमचा प्रयत्न आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.