RTO : टॅक्सी चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी आरटीओ समोर निदर्शने

एमपीसी न्यूज – ओला उबेर या कंपनीमध्ये चालणाऱ्या(RTO) टॅक्सी चालक-मालकांच्या अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांसाठी त्यांनी आज पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गाड्या बंद करून आरटीओ समोर आंदोलन करण्यात आले.

ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली (RTO) आंदोलन करण्यात आले, यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, सागर धर्मे, सचिन रसाळ, स्वप्निल गवळी, शैलेश कोकाटे, शरद हराळे, अनिल जायनोरे, शेखर अडसूळ, अरुण हिवाळे, अंकुश पवार, संदीप राठोड, परमेश्वर ससे, राहुल साखरे, मयूर तर, राहुल धनवे, हनुमंत कोळी, मनोहर पाटील, रमेश जाधव, पियुष पालनकर, संदीप शेवाळे रतन बोरसुरे, तुषार खाडे, विष्णू मुंडे, दत्ता पांचावरे, मंगेश बोरगे,भागवत साजेकर, गणपत सांगळे, सुनिल ढोबळ, समाधान पांढरे, किरण कुमार आदी उपस्थित होते.

Chinchwad: कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणाऱ्या आरोपीला अटक

व्यवसाय करताना प्रत्येक वाहनाचे खाजगी दर ठरलेले आहेत.(RTO) त्यामध्ये ईरटीगर गाडी डिझायर गाड्यांचे वेगवेगळे दर आहेत, परंतु ओला उबेर कंपनी मात्र सर्वांना सरसकट दहा रुपये दर देत आहे. हा दर अत्यंत कमी असून यामुळे टॅक्सी चालकांचे पेट्रोल डिझेल इतर खर्च व बँकेचे हप्ते भरणे देखील मुश्किल झाले आहे.

यामुळे किमान 16 रुपये दर मिळावा अशी सर्व टॅक्सी चालकांची केली असून, या मागणीसाठी व इतर विविध प्रश्नांसाठी आज सर्व टॅक्सी बंद ठेवून पुणे आरटीओ समोर आंदोलन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.