Chinchwad: कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज- घरात घुसून कोयत्याचा धाक(Chinchwad) दाखवत दोघांना लुटणाऱ्या आरोपीला पिंपरी पोलीस आणि बेड्या ठोकले आहेत ही घटना रविवारी (दि.8) सायंकाळी चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी अविनाश उर्फ अव्या कुसाळकर (वय 31 रा चिंचवड) याला अटक केली आहे. तर पिंपरी पोलीस ठाण्यात अलोक बन्सी महारेना (वय 35 रा चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

NCP : आता निवडणूक विकासावर नव्हे विचारावर होणार – जयंत पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व(Chinchwad)त्यांचे सोबती सुजित प्रेमचंद कुमार हे त्यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये बसले असताना आरोपी अनधिकृतपणे घरात घुसला. त्याने हातातील कोयता दाखवत फिर्यादी व त्यांच्या साथीदाराला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल असा 19 हजारांचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. यावेळी बघ्याची गर्दी जमली असता, आरोपीने माझ्या नादाला लागायचे नाही मी खल्लास करून टाकीन अशी धमकी देत परिसरात दहशत पसरवली. पिंपरी पोलिसांनी घटनेची माहिती मिळतात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.