Pune : 14 ऑक्टोबर रोजी ‘ गजल के साये में कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन (Pune) आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ गजल के साये में’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डॉ.सुनीला धनेश्वर प्रस्तुत करणार आहेत. शनीवार, 14 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.

Nigdi : जनसंवाद सभेत ‘चाय-बिस्किट’ आंदोलन

अनय इनामदार,अरुण गवई,अनुप कुलथे,अनिरुद्ध दडके साथ संगत(Pune) करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 184 वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.