Nigdi : जनसंवाद सभेत ‘चाय-बिस्किट’ आंदोलन

एमपीसी न्यूज – वारंवार तक्रार करुन, जनसंवाद सभेत बोलूनही निगडी (Nigdi) परिसरातील पाण्याची समस्या सुटत नसल्याने मनसेने फ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत ‘चाय-बिस्किट’ आंदोलन केले. निगडी,यमुनानगर, साईनाथनगर सेक्टर 22, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये निगडी प्रभाग क्रमांक 13, यमुनानगर, निगडी, साईनाथनगर, सेक्टर 22, या भागामध्ये गेले एक महिन्यापासून पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे.

पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रार देऊनसुद्धा पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नाही. पाणी दुसऱ्या भागाला वळवल्यामुळे निगडी यमुना नगर सेक्टर 22 या भागात पाणी नागरिकांना मिळत नाही. वेळोवेळी प्रशासनाला पाणीपुरवठा विभागाला तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही.

NCP : अजित पवार यांनी गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणून दाखवावेत – मेहबूब शेख

त्यामुळे जनसंवाद सभेमध्ये जाऊन प्रत्येक अधिकारी यांना चाय बिस्किट स्वतःच्या हाताने खायला घातले. निगरगट प्रशासनाला (Nigdi) पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले. पुढे सात दिवसांचा अल्टिमेटम पाणीपुरवठा विभागाला देण्यात आलेला आहे. अन्यथा अजून तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.