NCP : पिंपरीत शरद पवार गटाचा शनिवारी मेळावा; फुटीनंतर पहिलाच मेळावा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर (NCP) शरद पवार यांच्या गटाचा पिंपरी-चिंचवडमधील पहिला मेळावा शनिवारी (दि.2) होणार आहे. पिंपरीतील मैदानात हा मेळावा होणार असून पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचेही उद्घघाटन केले जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी चौकातील शनी मंदिराशेजारी उभारण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार असून पदाधिका-यांना नियुक्तीपत्र वाटप, कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

MPSC : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष्य केंद्रित केले. शहरातील पक्ष संघटना, आमदार, बहुतांशी माजी नगरसेवकांनीही त्यांना साथ दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहरात लक्ष्य घातले. आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविली.

जुन्या पुणे-मुंबई महार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणा-या सेवा रस्त्यावर खराळवाडीत अजित पवार गटाचे तर महामार्गावरुन (NCP) निगडीकडे जाणा-या रस्त्यावर पिंपरीत शरद पवार यांच्या गटाचे कार्यालय आहे. दोन्ही पक्षांची कार्यालये समोरा-समोर असणार आहेत. त्यामुळे भविष्यात दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.