Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2023 दैनंदिन कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज : आळंदी येथे (Alandi) श्री संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2023 संपन्न होत आहे. कार्तिकी यात्रेमध्ये मंदिरात होणाऱ्या दैनंदिन, भजन कीर्तन, जागरणचे अधिकृत कार्यक्रम 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तर्फे,सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य (संस्थान तर्फे),वीणा मंडपात सायं 6 ते 8 कीर्तन सेवा ह भ प मुक्ताबाई फडातर्फे होणार असून रात्री 8 ते 8:30 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तर्फे धुपारती, रात्री 11 ते 11:30 श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे शेजारती संपन्न होणार आहे.

सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती (श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तर्फे)सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य (संस्थान तर्फे), सायंकाळी 6 ते 8 वाजता वीणा मंडपात कीर्तन सेवा हभप बापूसाहेब ठाकूर यांच्या तर्फे होत असून, सायंकाळी श्रींची दिंडी (श्रीगुरु हैबतराव बाबा दिंडी) पंढरपूरहुन आगमन, रात्री 8 ते 8: 30 वाजता धुपारती संस्थान तर्फे रात्री 11 ते 11:30 शेजारती संस्थान तर्फे होणार आहे.

मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तर्फे,सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी 7 ते 9 वै.ह भ प हैबतबाबा पायरी पूजा हभप बाळासाहेब पवार हैबतरावबाबा वंशज /प्रतिनिधी यांच्या तर्फे होणार आहे.

दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य(संस्थान तर्फे),सायंकाळी 6 ते 8 वाजता वीणा मंडपात कीर्तन ह भ योगीराज ठाकूर यांच्या तर्फे (Alandi) किर्तन सेवा होत असून,रात्री 8 ते 8:30 धुपारती संस्थान तर्फे,रात्री 9 ते 11 वीणा मंडपात ह भ प बाबासाहेब आजरेकर यांचे तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार असून ,रात्री 10 ते 12 हैबतबाबा पायरीच्या पुढे जागर (मारुतबुबा कराडकर),रात्री 2 ते 4 हैबतबाबांच्या पायरी पुढे जागर (ह भ प आरफळकर) होणार आहे.

बुधवार दिनांक 6 रोजी पहाटे 3 ते 5 पवमान, अभिषेक व दुधारती (संस्थान तर्फे), पहाटे 5 ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत श्रींच्या चलपदुकांवर महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 वीणा मंडपात ह भ प बाबासाहेब देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार असून, रात्री 8:30 ते 9 धुपारती (संस्थान तर्फे),रात्री 9:30 ते 11 वा. वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.

NCP : पिंपरीत शरद पवार गटाचा शनिवारी मेळावा; फुटीनंतर पहिलाच मेळावा

कार्तिक वद्य दशमी गुरुवार दिनांक 7 रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती(संस्थान),सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य (संस्थान तर्फे), सायं.4:30 ते 6:30 वा. हभप गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा,सायंकाळी 6:30 ते 8:30वा. वीणा मंडपामध्ये धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री 9 ते 11 श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणा (संस्थान नियुक्त श्रींचे चोपदार), रात्री 9 ते 11 हभप वासकर महाराज कीर्तन सेवा (वीणा मंडप), रात्री 11 ते 11:30 धुपारती, (संस्थान तर्फे) रात्री 11:30 ते 12:30 विणा मंडपात जागर (हभप वाल्हेकर महाराज) होणार आहे.

कार्तिक वद्य 10 (शुक्रवार स्मार्त एकादशी) दि. 8 रोजी पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती (संस्थान तर्फे), सकाळी 5 ते 11:30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य (संस्थान तर्फे),सायंकाळी 4:30 ते 6:30 वीणा मंडपामध्ये ह भ प गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा होत असून, रात्री 8:30 ते 9 धुपारती(संस्थान तर्फे ), रात्री 9 ते 11 वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. रात्री 11:30 ते 12:30 वीणा मंडपात जागर (वाल्हेकर महाराज) होत आहे.

कार्तिक वद्य12 भागवत एकादशी शनिवार दिनांक 9 रात्री 12:30 ते पहाटे 2 पवमान अभिषेक व दुधारती, 11 ब्रम्हवृंदांच्या वेद घोषात ,दुपारी 12 ते 12:30 महानैवेद्य, दुपारी 1 वाजता श्रींची नगर प्रदक्षिणा, रात्री 8:30 धुपारती,(संस्थान),रात्रीच्या 12 ते 2 जागर( श्री मोझे ).होणार आहे.

कार्तिक वद्य 12 द्वादशी वार रविवार दिनांक 10 रोजी पहाटे 2 ते 3:30 पवमान अभिषेक व दुधारती (संस्थानतर्फे ),पहाटे 3:30 ते 4 मा. प्रांतसाहेब,खेड यांचे हस्ते पंचोपचार पूजा संपन्न होणार आहे.

NCP : पिंपरीत शरद पवार गटाचा शनिवारी मेळावा; फुटीनंतर पहिलाच मेळावा

पहाटे 3 ते 6 मुक्ताई मंडपात काकडा भजन सेवा (नांदेडकर मंडळींची दिंडी क्र.15) संपन्न होणार आहे.दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य(संस्थान तर्फे) ,दुपारी 4 ते 7 रथोत्सव संपन्न होणार आहे. दुपारी 4 ते 6 वीणा मंडपात ह भ प हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार असून रात्री 9 ते 11 वीणा मंडपात ह भ प केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.

कार्तिक वद्य 13/14 त्रयोदशी वार सोमवार दिनांक 11 रोजी पहाटे 3 ते 4 पवमान अभिषेक व दुधारती(प्रमुख विश्वस्त संस्थान),सकाळी 5 ते 9: 30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा,सकाळी 7ते 9 हैबतबाबा पायरी पुढे कीर्तन (ह भ प हैबतबाबा आरफळकर),सकाळी 7 ते 9 विणा मंडपा मध्ये कीर्तन संस्थान,सकाळी 7 ते 9 भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन,सकाळी 9 ते 12 ह भ प नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन,दुपारी 12 ते 12:30 726 वा संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटा नाद ,पुष्पवृष्टी व आरती मान्यवरांना नारळ प्रसाद,दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 विणा मंडपात ह भ प सोपान काका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा,रात्री 8:30 ते 9 धुपारती(संस्थान),रात्री 9:30 ते 11:30 कारंजा मंडपा मध्ये भजन(हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर) ,रात्री 12 ते 4 जागर (हैबतरावबाबा आरफळकर) होणार आहे.

कार्तिक आमावस्या मंगळवार दि.12 रोजी पहाटे 3 ते 5 पवमानपूजा,दुधारती (संस्थान),सकाळी 5 ते 11 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा,दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, दुपारी 4 ते 6 श्री मोझे यांच्या तर्फे कीर्तन सेवा.रात्री 8 ते 8:30 धुपारती (संस्थान),रात्री 9:30 ते 12:30 श्रींचा छबिना (संस्थान तर्फे),रात्री 12:30 शेजारती (संस्थान तर्फे) संपन्न होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.