Chinchwad crime : आम्ही इथले स्थानिक आहोत म्हणत शेजाऱ्याने केली शिवीगाळ

एमपीसी न्यूज – घरात उशिरापर्यंत भाऊबिजेचा कार्यक्रम सुरु असल्याच्या रागाने शेजाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केली. (Chinchwad crime) हा प्रकार मंगळवारी (दि.25) चिंचवड येथे घडला आहे.

सागर अप्पासाहेब लावंड (वय 27 रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सचिन ताम्हाणे (रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) व त्याचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saree distribution : एक साडी “ती” च्यासाठी या उपक्रमांतर्गत 4,000 गरजू महिलांना साडी वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी त्यांच्या पत्नी व मेहुणे भाऊबीज करत होते. यावेळी फिर्यादीचे राहते घराचे शेजारील सचिन ताम्हाणे तेथे आले व त्यांनी शिवीगाळ करत तू झोपतो का नाही का मी इंगळेला फोन करु असे म्हणून तू बाहेर ये म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.(Chinchwad crime) फिर्यादी व त्यांचे नातेवाईक घराबाहेर आले असता आरोपी व त्याच्या नातेवाईकांनी फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच आम्ही इथले स्थायीक आहोत, तुम्ही इथले नाहीत म्हणत शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पट्टीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.