PMC Elections : महापालिका निवडणूक लांबणीवर ; माजी, प्रबळ इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणूक दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याने माजी नगरसेवक आणि प्रबळ इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. (PMC Elections) महापालिका निवडणूक नेमकी कधी होणार, ते सांगता येत नसल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

मार्च महिन्यापासून पुणे महापालिका प्रशासकीय राज आहे. जवळपास 8 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. इतक्या प्रदीर्घ काळ प्रशासन राज राहणे बरोबर नाही.(PMC Elections) 4 चा प्रभाग म्हणून निवडणुकीचे काम सुरू करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.

Chinchwad crime : आम्ही इथले स्थानिक आहोत म्हणत शेजाऱ्याने केली शिवीगाळ

आगामी महापालिका निवडणुकीसाठी समाविष्ट गावे वगळण्याची मागणी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. तर, ही गावे वगळल्यास आंदोलन करण्याचा इशारा (PMC Elections) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिला आहे. या गावांमध्ये रस्ते, पाणी, कचरा, गार्डन, हॉस्पिटल या प्राथमिक सोईसुविधा देणे आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.