Pimpri News: या चिमण्यांनो परत फिरा…!

एमपीसी न्यूज – आकुर्डी काळभोरनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मनीष काळभोर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चिमण्यांसाठी घरे बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील झाडांवर ही घरटी बसविण्यात येत असून यामुळे चिमणी, पाखरांना स्वतःचे घर मिळणार आहे. यानिमित्त शहरातून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना नक्कीच दिलासा मिळेल. चिमण्यांमध्ये वाढ होईल.

अनेक जण आपला वाढदिवस साजरा करतात. काहीजण वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवितात. सामाजिक कार्यकर्ते मनीष काळभोर यांनी आपला वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा करत विविध उपक्रम राबविले.

देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून मोरया गोसावी मंदिरात अभिषेक करण्यात आला. काळभोरनगर येथील मदर तेरेसा होम येथे अन्नदान, काळभोरनगर, मोहननगर परिसरात सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमास जगदंब प्रतिष्ठान, राष्ट्र तेज तरुण मंडळ, सी इ ओ ग्रुप, हिंदवी स्वराज्य संघटना, अचानक मित्र मंडळ, खंडेराया मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, एच एस आर स्पोर्ट्स क्लब, चांगभलं प्रतिष्ठान, श्री गणेश प्रसारक ट्रस्ट, सूर्योदय मित्र मंडळ आदींचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.