Pimpri corona update : पिंपरी चिंचवड शहरात रविवारी नवीन 750 रुग्ण; एकूण संख्या 41 हजार 648

New 750 corona patients in Pimpri Chinchwad city; total count 41,648.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 73) 750 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 41 हजार 648 झाली आहे. 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 792 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 6 हजार 629 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 792 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 27 हजार 957 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत झालेले आज मृत झालेले रुग्ण काळेवाडी (स्त्री 50 वर्षे, स्त्री 63 वर्षे), चिंचवड (स्त्री 73 वर्षे), थेरगाव (पुरुष 46 वर्षे), निगडी (स्त्री 45 वर्षे), सांगवी (पुरुष 82 वर्ष), जुन्नर (पुरुष 50 वर्षे), आंबेगाव (पुरुष 39 वर्षे, स्त्री 65 वर्षे), खेड (पुरुष 72 वर्षे), धानोरी (पुरुष 50 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 7 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 601 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 113 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 16 हजार 761 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 53 हजार 326 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.