Pimpri : लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून यंदा निवडणुकीसाठी नव्याने समावेश

यंदा 10 नोंदणीकृत चिन्हांसह; 197 मुक्त चिन्हे; 94 जुनी चिन्हे आयोगाकडून कालबाह्य

एमपीसी न्यूज – निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी 207 प्रकारची चिन्हे दिली आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी 10 चिन्हे तर अपक्ष व नोंदणीकृत पक्ष नसलेल्या उमेदवारांसाठी 197 प्रकारची मुक्तचिन्हे दिली आहेत. त्यामुळे कोणाला कलिंगड, कोणाला बॅट, दळण दळणारे जाते. तर, कोणाला माइक, तर कोणाला हाती किटली घ्यावी लागणार आहे.

त्याचबरोबर भाजीपाला, फळे, संगणकाचे साहित्य, जाते, झोपाळा यासह खाद्यपदार्थाचे ताट आदी चिन्हांचाही समावेश आहे. आयोगाने चिन्हे निश्चित करताना नव्या व जुन्यांचा मेळ घालत लोकप्रिय लुडो चिन्हाचा नव्याने समावेश केला आहे. दैनंदिन वापरातील अधिकाधिक वस्तू कशा राहतील, याचीही काळजी घेतली आहे. तसेच 94 जुनी चिन्हे आयोगाने कालबाह्य देखील केली आहेत.

निवडणुकांचा प्रचार खर्‍या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत त आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हांला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून समावेश केला आहे.

चिन्हांची निवड करताना आयोगाने पँट, चप्पल, बूट, टोपी, पर्स, अंगठी, बेल्ट आदी वस्तूंचा वापर केला आहे. अशा प्रकारे आयोगाने विधानसभा निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी 207 चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी 10 चिन्हे तर अपक्ष व नोंदणीकृत पक्ष नसलेल्या उमेदवारांसाठी 197 प्रकारची मुक्तचिन्हे दिली आहेत.

यंदा 94 चिन्हे कमी

लोकसभा निवडणुकीत 301 चिन्हे आयोगाने दिली होती. यामध्ये राष्ट्रीय पक्षांसाठी सात चिन्हे, राज्यस्तरावरील पक्षांसाठी 64 तर अपक्ष उमेदवारांसाठी 230 प्रकारच्या चिन्हांचा समावेश होता. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने 94 चिन्हे कमी केली आहेत. यामध्ये राज्यस्तरावरील चिन्हे कमी केली आहेत, तर काही मुक्तचिन्हांमध्ये बदल केला आहे.

‘ही’ आहेत राखीव चिन्हे

राष्ट्रीय पक्ष असलेल्या बसपासाठी हत्ती, भाजपचे कमळ, कम्युनिस्ट पार्टीचे कणीस आणि विळा, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सचे हातोडा, विळा आणि तारा, काँग्रेसचे हात, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, राष्ट्रीय जनता पार्टीचे पुस्तक, मनसेचे रेल्वे इंजिन तर शिवसेनेचे धनुष्यबाण ही 10 संबंधित पक्षांसाठी चिन्हे राखीव आहेत.

अजब-गजब मुक्त चिन्हे!
मुक्त चिन्हांमध्ये नरसाळे, तंबू, हेल्मेट, सिमला मिरची, लायटर, ङ्गुलकोबी, कोट, दरवाजाची घंटी, नरसाळे, हेलिकॉप्टर,  टायर्स, लोकर व सुई, कपाट, दुर्बिण,  ऊस शेतकरी, हेल्मेट, पत्रपेटी,  जेवणाचे ताट, करवत, स्टेप्लर,   व्हॅक्यूम क्लीनर, सङ्गरचंद, बिस्किट,  ड्रील मशीन, गॅस सिलिंडर, हॉकी आणि बॉल, लायटर, मटार, प्लेट स्टँड, शाळेचे दप्तर, स्टेथोस्कोप, अशा अजब-गजब गोष्टींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.