Pimpri : आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघ विजेता

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ (मुले) स्पर्धेमध्ये पीसीसीओई संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. तसेच पीसीसीओईच्या दोन खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली.

बेल्हे येथे आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ४० संघांनी तर वैयक्तिक प्रकारात १३७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) संघाने ७ फे-यानंतर २२.५ गुण मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले. तर आकुर्डीच्या डीवायपीआयईएमआर संघाने २०.५ गुण मिळवून उपविजेते मिळविले. वैयक्तिक प्रकारात पीसीसीओईचे खेळाडू विशाल पांगे यांने ६.५ गुण मिळवून दुसरे स्थान आणि यशवंत तेलंग याने अनुक्रमे वैयक्तिक ६ गुण मिळवत पाचवे स्थान मिळविले व पुणे जिल्ह्याच्या संघात प्रवेश निश्चित केला.

पीसीसीओईच्या विजयी संघातील खेळाडू श्रेयस गायकवाड़, प्रमोद थोरात, विशाल पांगे, यशवंत तेलंग, खंडागळे यशोदीप व महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांना पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विजेत्या खेळाडूंचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विजेते खेळाडू व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.