Nigdi : फ्रान्समध्ये उच्च शिक्षण व करिअरच्या उज्वल संधी – डॉ. फिलिप मॉरीन

पीसीसीओई मध्ये फ्रान्स मधील शैक्षणिक संधी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

एमपीसी न्यूज – जगात शैक्षणिक क्षेत्रांसह व्यवसाय व्यवस्थापन,(Nigdi) कला, फॅशन डिझायनिंग, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात देखील फ्रान्स आघाडीवर आहे. संशोधन, विकास यावर लक्ष केंद्रित केलेल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या अनेक प्रसिद्ध शिक्षण संस्था, विद्यापीठे फ्रान्स देशात आहेत. एवढेच नाही तर फ्रान्स मधील 73 संशोधकांनी नोबेल पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे. भारत देशासह  जगभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधन साठी उज्ज्वल संधी आहेत असे प्रतिपादन वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ज्ञ संचालक डॉ. फिलिप मॉरीन यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (Nigdi)मध्ये मुंबईतील फ्रान्स वाणिज्य दूतावास कार्यालयातील शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी त्यांनी फ्रान्स मधील शैक्षणिक संधी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी भारतातील फ्रेंच दूतावासातील वैज्ञानिक, शैक्षणिक आणि तांत्रिक सहकार्य अधिकारी मेयुल कुलोन, कॅम्पस फ्रान्स मॅनेजर (पुणे) रिनी अब्राहम, पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभाग प्रमुख डॉ. रोशनी राऊत, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
रिनी यांनी कॅम्पस फ्रान्स या सरकारी एजन्सीबद्दल एक सादरीकरण केले. ही संस्था फ्रेंच परराष्ट्र मंत्रालय आणि उच्च शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. फ्रान्समध्ये शिक्षण घेत असताना भाषेच्या अडथळ्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. येथे शिष्यवृत्ती, फी सवलत, अनुदान, भाडे भत्ता आणि इतर फायद्यांसह आर्थिक मदत केली जाते याविषयी माहिती दिली.

फ्रान्समध्ये येण्यासाठी प्रक्रिया स्पष्ट केल्या, योग्य कार्यक्रम निवडणे, विद्यापीठांमध्ये अर्ज करणे, व्हिसासाठी अर्ज करणे. कॅम्पस फ्रान्समध्ये विद्यापीठे आणि शाळा विविध पर्याय, रँकिंगसह दर्जेदार शिक्षण, इंटर्नशिप आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवण्यात देखील मदत करतात. तसेच नोकरी शोधण्यासाठी दोन वर्षांचा स्टे बॅक व्हिसा समाविष्ट आहे. कॅम्पस फ्रान्समध्ये सुमारे दहा हजार सदस्यांचे माजी विद्यार्थी नेटवर्क असून आवश्यक मदत केली जाते असे रिनी यांनी सांगितले.

 

विद्यार्थ्यांना प्रक्रिया, अर्ज, व्हिसा, फ्रेंच शिक्षण प्रणाली समजून घेणे, शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य, संशोधनाच्या संधी आणि सहयोग, सांस्कृतिक आणि भाषिक ज्ञान या विषयावर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.