Maval : माझ्या वाट्याला गेलात तर मी सुद्धा शरद पवार आहे; शरद पवार यांचा सुनील शेळके यांना सज्जड इशारा

एमपीसी न्यूज : मावळचे आमदार सुनील शेळके (Maval) हे कार्यकर्त्यांना दम देतात, संवाद मेळाव्याला जाऊ नका म्हणून सांगतात असे कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सांगितले.  तेव्हा भाषणात बोलताना शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची चांगलीच कान उघडणी केली. अरे तू, आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आले होते, त्यावेळी पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता, तुझ्या फॉर्म व चिन्हासाठी नेत्यांची सही लागते ती माझी आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते तुला निवडून आणायसाठी राबले, त्याच कार्यकर्त्यांना दमदाटी करता, सभेला जाऊ नका सांगता, माझी विनंती आहे, एकदा दम दिला आता बस्स… पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना सुनावले आहे.

लोणावळ्यात आज गुरुवारी (7 मार्च) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी लोणावळा राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील 300 जणांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला.

या संवाद मेळाव्याला, माजी राज्यमंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, माजी महापौर संजोग वाघिरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, ज्येष्ठ नेते रमेश नय्यर, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पै. चंद्रकांत सातकर, कुमार धायगुडे, नंदकुमार वाळूंज, नासीर शेख, यशवंत उर्फ बाळासाहेब पायगुडे, विनोद होगले आदी उपस्थित होते.

Nigdi : फ्रान्समध्ये उच्च शिक्षण व करिअरच्या उज्वल संधी – डॉ. फिलिप मॉरीन

शरद पवार म्हणाले, भाजपा ही आज एक वॉशिंग मशीन झाली आहे. ज्यांच्यावर आरोप झाले असतील त्यांना पक्षात घ्यायचे व स्वच्छ करायचे असा प्रकार सुरू आहे. आदर्श घोटाळा व राज्य सहकारी बँक घोटाळा याचे आरोप ज्यांच्यावर झाले; (Maval) त्यातील एक आज भाजपवासी झाले तर दुसऱ्याशी युती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या जाहिराती करत आहेत, त्या कोणाच्या पैशाने करत आहेत तर जनतेच्या पैशातून जाहिराती करत मोदी की गॅरंटी देत आहेत, ही कसली गॅरंटी असा हल्लाबोल पवार यांनी केला.

मदन बाफना म्हणाले, छगन भुजबळ यांनी तुरुंगात घडलेले किस्से व होणारे हाल सांगितल्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे पक्ष सोडून पळाले, असा हल्ला बोल कोणाचे नाव न घेता पक्ष सोडून गेल्यावर केला.

लोणावळ्यातील यशवंत पायगुडे व मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी लोणावळा व मावळातील परिस्थिती पवार यांना सांगितली. संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक फिरोज शेख यांनी केले तर यशवंत पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.