New Delhi : अमित शहा गृहमंत्री, निर्मला सीतारामन अर्थमंत्री तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री

मोदी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

एमपीसी न्यूज- शानदार शपथविधी सोहळ्यानंतर मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज शुक्रवारी मंत्र्यांची खातेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये एकूण 57 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि 24 राज्यमंत्री आहेत. नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रामदास आठवले यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपदे मिळाली आहेत. असे झाले आहे खातेवाटप……

डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- परराष्ट्र व्यवहार
अमित शहा- गृह
राजनाथ सिंग- संरक्षण
निर्मला सीतारामन- अर्थ
नितीन गडकरी- रस्ते बांधणी दळणवळण
नरेंद्रसिंह तोमर- कृषी
स्मृती इराणी – महिला व बालकल्याण, केंद्रीय मनुष्यबळ,
रविशंकर प्रसाद- इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, कायदा व न्याय
रामदास आठवले- सामाजिक न्याय
रावसाहेब दानवे– ग्राहक संरक्षण
अरविंद सावंत- अवजड उद्योग
पियुष गोयल- रेल्वे

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.