New Delhi News : मोदी सरकरचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

एमपीसीन्यूज : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज, बुधवारी मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला. तसेच सध्या सुरु असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.

येत्या 12 डिसेंबरला राजस्थान हायवे आणि दिल्ली बॉर्डर जाम करणार. 14 डिसेंबर रोजी एक दिवसाचं उपोषण करणार असल्याचे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले. त्याच दिवशी संपूर्ण देशभरात धरणे आंदोलनही केले जाईल. जोपर्यंत मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.

कृषी सुधारणा कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हरयाणा आणि राजस्थानमधले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर १४ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. दरम्यान, आज, मोदी सरकारने या शेतकऱ्यांसमोर ठेवलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला.

तर आज, विरोधी पक्षाच्या पाच नेत्यांचं शिष्टमंडळही राष्ट्रपतींना भेटले. त्यांनीही शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणारे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.