New Delhi News : Paytm पुन्हा Google Play Store वर उपलब्ध

याआधी ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरण्यात येणारे पेटीएम अ‍ॅप गुगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकले होते.

एमपीसीन्यूज  : Paytm अ‍ॅप पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल, असे पेटीएमकडून सांगण्यात आले.

‘एएनआय’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरण्यात येणारे पेटीएम अ‍ॅप गुगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकले होते.

त्यासाठी पेटीएमच्या माध्यमातून खेळासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी संमती देत नाही.  त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही, असे स्पष्टीकरणही गुगलने दिले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर आता पुन्हा एकदा Paytm App गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे.

Paytm mobile application is again available on Google Play Store for download: Paytm https://t.co/kFjJXu9ply

— ANI (@ANI) September 18, 2020

दरम्यान, गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.