New Delhi : 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्ततातेचा लाभ

लोकसभेमध्ये हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर

एमपीसी न्यूज- आयकराच्या मर्यादेमध्ये वाढ करून आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्त करण्यात आले आहे. हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करीत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे.

आज केंद्रातील भाजप आघाडी सरकारकडून सहावा आणि शेवटचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. दुष्काळ व नापिकीच्या समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. या योजनेमुळे एकूण 12 कोटी शेतकऱ्याना याचा लाभ होणार आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेला खुश केले आहे.

अर्थसंकल्प सादर करताना पियुष गोयल यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असून महागाईचा दर आतापर्यंत निचांकी पातळीवर आला असल्याचा दावा केला. रेरा कायद्यामुळे बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. आयुष्यमान योजनेमुळे गरिबांचे तब्बल 3 हजार कोटी रुपये वाचले असे त्यांनी सांगितले.

पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

महत्वाचे

# 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्तततेचा लाभ
# येत्या 5 वर्षात 1 लाख गाव डिजिटल करणार
# छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मध्ये सवलत
# वन रँक वन पेन्शन योजना लागू
# 40 हजारापर्यंतचे व्याज करमुक्त
# पीएफ अथवा समभागांमध्ये साडेसहा लाखांपर्यंतची गुंतवणूक केल्यास कर भरावा लागणार नाही

शेतकऱ्यांसाठी
# 5 एकर पर्यंतच्या छोट्या शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये मिळणार
# 2 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 6 हजार जमा होणार
# गायींसाठी राष्टीय कामधेनू योजनेची घोषणा
# मत्स्यपालनासाठी स्वतंत्र आयोग

कामगारांसाठी
# 21 हजारापर्यंत पगार असलेल्या असंघटित कामगारांना 7000 रुपये बोनस
# ग्रॅज्युइटीची मर्यादा 10 लाखावरून 20 लाख
# असंघटित कामगाराना मासिक 3000 रुपये पेन्शन

महिला कर्मचाऱ्यांसाठी
# गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी सुट्टी

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.