Wakad : पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 24) रोजी सकाळी अकराच्या सुमारास जगताप डेअरी वाकड येथे घडली.

अरुण मनोज विश्वकर्मा (वय 3) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मनोज विश्वकर्मा (रा. क्षितिज कॉलनी, चामुंडा मार्बल जवळ, जगताप डेअरी, वाकड) यांनी याबाबत वाकड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण गुरुवारी घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याच्या टाकीजवळ आला. त्याचा तोल जाऊन तो पाण्याच्या टाकीत पडला. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी औंध हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस हवालदार डी. एस. शेळके तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.