Pimpri : मंडईतील व्यापा-यांचे भाजीपाल्यासह महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पातील श्री लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यात यावे यामागणीसाठी व्यापा-यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आज (शुक्रवारी) आंदोलन केले. प्रवेशद्वारासमोर भाजीपाला फेकून व्यापा-यांनी आंदोलन केले आहे.

शहरातील पिंपरी कॅम्प ही महत्वाची बाजारपेठ आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स व कापडासाठी ही बाजारपेठ प्रसद्धि आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे शहर,मावळ तालुका व परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी विविध वस्तू खरेदीसाठी येत असतात. मात्र, या बाजारपेठेत पथारी व हातगाडीचालकांचे अतिक्रमण वाढत असून , त्यामुळे स्थानिक व्यापा-यांना व्यवसाय करणे अवघड होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

पिंपरी भाजी मंडईला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. ही अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी भाजी मंडईतील व्यापा-यांनी केली आहे. भाजीमंडई समोरील फेरीवाले, पथारीवाले यांना हटविण्याची मागणी केली जात आहे. अतिक्रमणावर कारवाई करावी या मागणीसाठी व्यापा-यांनी आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.