New Look Of Shaktiman: शक्तिमान मुकेश खन्ना यांचे प्रेक्षकांना लवकरच सरप्राईज…

New Look Of Shaktiman: Shaktiman Mukesh Khanna's soon surprise audience शक्तिमान हे पात्र साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.

एमपीसी न्यूज- जेव्हा मालिका विश्वाची प्रेक्षकांना फार माहिती नव्हती, तेव्हा काही मालिका मात्र लोकांच्या मनात घर करुन होत्या. तेव्हा सध्या सारख्या डेलीसोपचा गाजावाजा नव्हता. मात्र त्यावेळी पहिला सुपरहिरो छोट्या पडद्यावर आला तो म्हणजे ‘शक्तिमान’. नव्वदच्या दशकातील ही मालिका दूरदर्शन वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका होती. सध्या त्याचे पुनर्प्रसारण होत असून आजही त्याची लोकप्रियता कायम आहे. आता शक्तिमानच्या चाहत्यांना लवकरच एक सरप्राइज मिळणार आहे.

शक्तिमान हे पात्र साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात शक्तिमान वेगळ्या रुपात दिसत असून त्याने चक्क मास्क लावून फोटो शेअर केला आहे. तसेच शक्तिमानच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीने देखील मास्क बांधलेला आहे.

मुकेश खन्ना यांनी हा फोटो शेअर करत ‘मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर लवकरच काही तरी नवीन घेणार आहे. वाट पाहा आणि तुम्हीच जाणून घ्या’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी अनेक तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.


अनेकांनी कमेंट करत शक्तिमान पुन्हा भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी कोरोनाविषयी जागरुकता पसरवण्यासाठी मुकेश खन्ना खास एपिसोड शूट करत असल्याचे म्हटले आहे.

मुकेश खन्ना यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेत त्यांनी टायटल रोल केला होता. महाभारत या मालिकेतील भीष्मपितामह नंतर मुकेश यांची शक्तिमान ही मालिका देखील प्रचंड गाजली होती. १३ सप्टेंबर १९९७ साली सुरु झाली होती आणि २७ मार्च २००५ मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.