New Parliament : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर नव्या संसदेत होणार कामकाजाला सुरुवात

एमपीसी न्यूज – संसदेच्या विशेष पाच दिवसीय अधिवेशनाला ( New Parliament ) आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकीमध्ये अधिवेशनातील कामकाजासंदर्भात परिपत्रत जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकानुसार गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर म्हणजे उद्या (मंगळवारी) नवीन संसदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जुन्या संसद भवनात फोटोसेशन झाल्यानंतर सर्व खासदार नव्या संसद भवनात जातील आणि तिथे अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल.
Pune : भारतात श्रवण यंत्रांची मोठया प्रमाणात गरज – डॉ.अनुराधा पौडवाल
संसदेच्या विशेष अधिवेशनात एकूण 8 विधेयके चर्चेसाठी येणार आहेत. विशेष म्हणजे, या विधेयकात केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे अधिकार मर्यादित करण्यासंदर्भातील विधेयकाचा समावेश नसल्याचं दिसून येत आहे. नव्या संसद भवनातही याच अधिवेशनातून कामकाजाला सुरुवात होणार आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांना माहिती दिल्यानुसार “कामकाजाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये दोन्ही सभागृह भरतील. पहिल्या दिवशी संसदेचा उज्ज्वल इतिहास आणि संसद भवनाची भव्य परंपरा यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांचं फोटोसेशन होईल”, असं ही ( New Parliament ) ते म्हणाले.