Alandi : आळंदी नगरपरिषद ताफ्यात नवीन वाहने दाखल

एमपीसी न्यूज : शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत (Alandi) आळंदी शहरासाठी असलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात मंजूर करण्यात आलेल्या 3 ट्रॅक्टर, 3 घंटागाडी, 1 बेलींग मशीन, 1 श्रेडर मशीन खरेदी केल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

देशातील वाढत्या शहरीकरणाबरोबर प्रत्येक शहरात कचऱ्याची समस्या निर्माण होत आहेत आणि यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने राज्य सरकारच्या मदतीने देशातील प्रत्येक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कचऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम करण्याकरिता स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल(DPR) मंजूर केले होते.

Vadgaon Maval : तहसील कार्यालयात ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सदर सविस्तर प्रकल्प अहवालात मंजूर करण्यात आलेली वाहने, यंत्र (Alandi) शासनाच्या जेम पोर्टल वरून नगरपरिषद मार्फत खरेदी करण्यात आली आहेत.

नवीन 3 घंटागाडीमुळे शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन, 3 ट्रॅक्टरमुळे कचऱ्याची वाहतूक, बेलींग व श्रेडर मशीन मुळे कचऱ्यावर प्रक्रिया चांगल्या प्रकारे करता येणे शक्य होणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.