Today’s Horoscope 12 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 April 2023
वार – बुधवार.
12.04.2023
शुभाशुभ विचार – 17 नंतर चांगला.
आज विशेष – सामान्य दिवस
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- मूळ 11.59 पर्यंत नंतर पूर्वाशाढा.
चंद्र राशी – धनु.
—————————————-
मेष (शुभ रंग – मोरपिशी)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस थोडासा विरोधी आहे. नोकरीत साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे धावण्याचा मोह होईल पण तसे करू नका. आज कायद्याच्या चौकटीतच राहा.

वृषभ (शुभ रंग – सोनेरी)
फक्त आपलं कसं भागतंय एवढंच बघा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक आज तरी करू नका. आज वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.

मिथुन (शुभ रंग – चंदेरी)
महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्यांचे उल्लंघन करू नका. सतर्क रहा, आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होऊ शकेल.

कर्क (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. कोर्ट प्रकरणे चालू असतील तर ती कोर्टाबाहेरच मिटवणे हिताचे.

सिंह (शुभ रंग – पांढरा) – Today’s Horoscope 12 April 2023
तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. उच्च शिक्षित मंडळींना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

कन्या (शुभ रंग – हिरवा)
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागू शकतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेम प्रकरणात मात्र फसगत होऊ शकते.

तूळ (शुभ रंग – लाल)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. काम कमी आणि दगदगच जास्त होईल. रिकाम टेकड्या चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही.

वृश्चिक (शुभ रंग – मोतिया)
धंद्यात अडकलेली येणी वसूल होतील. विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्याल. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल. आजचे प्रवास मात्र त्रासदायक होतील.

धनु (शुभ रंग – क्रीम)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. दूरचे प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल.

मकर (शुभ रंग – पिस्ता)
आज पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित काही कामे गती घेतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे. कठोर बोलण्याने तुमचे हितचिंतकच दुरावतील.

कुंभ (शुभ रंग – केशरी)
आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने फक्त शुभच चिंता. तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णयही आज योग्य ठरतील. काही दुरावलेली नाती सुद्धा जवळ येणार आहेत.

मीन (शुभ रंग – जांभळा)
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याच्या संधी चालून येणार आहेत. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. विश्वासू मित्र आज दगा देऊ शकतील.

Vadgaon Maval : तहसील कार्यालयात ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.