Pune News : बारामतीचा पुढचा खासदार भाजपचाच – चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणशिंग फुंकले

एमपीसी न्यूज – भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी 2024 साली बारामतीचा खासदार हा भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काटेवाडी गावात आयोजित केलेल्या बूथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. यासाठी त्यांनी बारामतीत बूथ कमिटीला मार्गदर्शन केले. देशातील चांगले किल्ले ढासळले आहेत. आता फक्त बारामती मतदारसंघ राहिला आहे. यासाठी मतदारांचे मन परिवर्तन करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. इथल्या कार्यकर्त्यांना जर अधिकाऱ्यांचा त्रास होत असेल तर ही बाब फडणवीस यांच्या कानावर घालणार असेही बावनकुळे म्हणाले.

दरम्यान मंगळवारी दिवसभर बारामती दौऱ्यावर असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या काटेवाडी शाखेचे उद्घाटन केले. यावेळी आमदार राहुल कुल गोपीचंद पडळकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.