Nigadi : शासकीय आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु; मुलींसाठी 125 पेक्षा जास्त जागा राखीव

14 ऑगस्ट ही प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आहे. : Online admission process of government ITIs started; More than 125 seats reserved for girls

एमपीसीन्यूज : निगडी येथील पिंपरी चिंचवड शासकीय औद्योगिक संस्थेची (आयटीआय) यंदाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरु झाली आहे. विविध व्यवसाय प्रक्षिशण अभ्यासक्रमामध्ये मुलींसाठी  125 पेक्षा जास्त जागा राखीव आहेत.

या वर्षी मशिनिष्ट, टर्नर , मशिनिष्ट-ग्रायडंर, फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन सिविल, ड्राफ्ट्समन मेकॅनिक , ऑपरेटर अँडव्हान्स मशिन टुल्स हे दोन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम, तर वेल्डर (GMAW & GTAW ),  शिटमेटल वर्कर,  कारपेंटर, प्लम्बर, फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग व फॉन्ड्रीमन हे एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

14 ऑगस्ट ही प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाईन प्रवेश आणि अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी admission.dvet.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डी. एस.जगताप यांनी केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना प्राचार्य जगताप म्हणाले, आयटीआयच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना नामांकित कंपन्यांमध्ये apprentice तसेच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात वाढत्या बेरोजगरीला अनुसरून आयटीआय प्रशिक्षण हे नोकरी / व्यवसायची हमी देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भवितव्यसाठी आयटीआयच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत मुलींसाठी व्यवसाय अभयसक्रमांमध्ये मिळून 125 पेक्षा जास्त जागा राखीव आहेत.

इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन  मेकॅनिक, ड्राफ्ट्समन सिविल, फूड अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा. तसेच कौशल्य विकास करून नोकरी व स्वयंरोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन प्राचार्य जगताप यांना केले आहे.

प्रवेशप्रक्रियेसाठी ओव्हाळ मँडम (7972709910), भुमकर सर (9850276373), पाटील सर (9881981899), खोमणे सर (9890907648), जंगम सर (9834304972), शिंगणात मँडम (9850557061) आणि गुरव (7798106759) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य जगताप यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.