Kivale : ‘प्लाझ्मा दान करा, एक हजार रुपये मानधन मिळवा’; युवा शिवसैनिकाचा उपक्रम

पिंपरी चिंचवड शहरात विकासनगर आणि किवळे या भागातच हे एकमेव अभियान सुरु आहे.  : Donate plasma, get a thousand rupees honorarium'; An initiative of young Shiv Sainiks

एमपीसीन्यूज : किवळे, विकासनगर येथे प्लाझ्मा दानासाठी अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना एक हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 40 नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला असल्याची माहिती या मोहिमेचे आयोजक युवा शिवसैनिक राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी सांगितले.

राजेंद्र तरस यांच्या वतीने फक्त विकासनगर आणि किवळे गावातील नागरिकांसाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या बाबत नागरिकांचे मोफत समुपदेशनही करण्यात येत आहे.

कोरोना रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर प्लाझ्माच्या उपचारानंतर संबंधित रुग्ण या आजारातून बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करून कोरोनाग्रस्तांना जीवदान द्यावे, असे आवाहन शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या प्लाझ्मा दान अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. कोरोना होऊन बरे झालेल्या रुग्णांची चौकशी करून व त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांना विनंती करून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या अभियानात आतापर्यंत 40 नागरिकांनी सहभाग घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहरात विकासनगर आणि किवळे या भागातच हे एकमेव अभियान सुरु आहे.

दरम्यान, या आवाहनाला कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तरस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.