BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi: आधीच्या पिढीने पाणी विहीरीत पाहिले, आताची पिढी बाटलीत पाहते -अभिनेते मकरंद अनासपुरे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – आधीच्या पिढीने पाणी विहीरीत पाहिले. तलावात पाहिले, आताची पिढी बाटलीत पाहत आहेत. पुढील पिढीला हे पाणी कसे दिसेल या बददल चिंताजनक स्थिती असेल. म्हणून पाणी संवर्धनाबाबत सजगता बाळगायला हवी, असे मत अभिनेते आणि नाम फौंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्वा निमित्त आयोजित व्याच्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी ‘पाणी हेच जीवन करु त्यांचे संवर्धन’ या विषयावर गुंफले. यावेळी ते बोलत होते.

  • संभाजीनगर चिंचवड येथे आयोजित या व्याख्यानमालेचा प्रारंभ ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर, नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक उत्तम केंदळे, सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते.

यावेळी मकरंद अनासपुरे म्हणाले, महापालिकेतील शहरातील प्रत्येक नागरीकांस एकशेऐंशी लीटर पाणी मिळते. तर, ग्रामीण भागातील माणसाला दहा लीटर पाणी मिळते आहे. शहरात पाण्याचा वापर जास्तीचा होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकाने पर्यावरणाचे संतुलन राखून पाण्याची बचत केली पाहिजे. तरच भविष्यातील पीढी आपल्याला माफ करेल.

HB_POST_END_FTR-A2

.