Nigadi : कामाला लावले असल्याचा दम देत तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – ‘मी तुला कामाला लावले आहे’ असा दम देत तरुणाचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री साडेबाराच्या सुमारास म्हाळुंगे यतेचे घडली.

कपिल रमेशचंद्र कुमार (वय 20, रा. भांबोली, ता. खेड) या तरुणाने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल नाथ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपिल म्हाळुंगे येथे थांबला असता आरोपीने तिथे येऊन ‘मी तुला कामाला लावले आहे’ असा दम दिला. तसेच कपिल याचा चार हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. कपिल याने मोबाईल फोन परत देण्याची विनंती केली असता आरोपीने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.