Nigdi : वसुधैव कुटुंबकम हि भावना प्रत्यक्षात आणावी- डॉ. अलेक्झांडर

एमपीसी न्यूज – विविधतेत एकतेचे दर्शन केवळ आपल्याच देशात दिसून येते. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भावना प्रत्यक्ष आचरणात आणली पाहिजे, असे मत माजी सनदी आधिकारी डॉ. जे अलेक्झांडर यांनी व्यक्त केले. निगडी येथील चिंचवड मल्याळी समाजम संचलित सीएमएस इंग्लिश मिडियम हायर सेकंडरी स्कूलच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माध्यमिक शिक्षण विभागाचे उपसचिव भाऊसाहेब कारेकर, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, जावेद शेख, अमित गावडे, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, माजी नगरसेवक आर एस कुमार, बाबू नायर, सीएमएसचे अध्यक्ष पी.व्ही भास्करन, सरचिटणीस टी.पी विजयन, मुख्याध्यापिका बीजी गोपकुमार आदी उपस्थित होते.

डॉ.अलेक्झांडर म्हणाले की, विशाल ह्रदय व मनाचा मोठेपणा जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा ‘हे विश्वची माझे घर’ ची प्रचिती येईल. तिमिरातूम तेजाकडे नेण्याची क्षमता केवळ शिक्षणामध्ये आहे. केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित शिक्षण नसावे तर मुलांचा सर्वांगीण विकास होणारे शिक्षण असावे. जीवन आनंदी व समृद्ध करणारे शिक्षण मिळावे. अशी अपेक्षा शेवटी व्यक्त केली.

ॲड. पटवर्धन यांनी सीएमएसने ज्ञानदान करून समाजाचे ऋण फेडण्याचे काम करीत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हि भावना कायम ठेवून कार्य करीत असल्याचे सांगून कौतुक केले. यावेळी अमित गोरखे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भास्करन यांनी केले. सूत्रसंचालन सिंधू नायर, गणेश वारे, मार्गारेट सोफिया यांनी केले तर आभार के.व्ही जनार्दन मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीएमएसचे उपाध्यक्ष के रघुनाथन, पी श्रीनिवासन, सहसचिव पी अजयकुमार, ज्योती दिनराज, व्ही.के रामकृष्णन, एम एम नंबीयार, हरिदास नायर,जी करुणाकरन, जीएस नायर, व्ही.सी अब्राहम, टी.डी जेकब, व्ही जॉय जोसेफ, पी के पुष्पांगथन, के पुष्पाकरन, व्ही शिवशंकर पिल्ले, चैताली लोंढे, मंजू थंपी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.