Nigdi : जुन्या महामार्गावर अपघातात कंटेनर, टँकर झाला लॉक

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर (Nigdi ) सोमवारी (दि. 17 ) पहाटे टँकर आणि कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहने लॉक झाली आहेत. निगडी वाहतूक पोलिसांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.

निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे साडेचार वाजताच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असलेल्या टँकर आणि कंटेनरचा अपघात झाला. दोन्ही वाहने लॉक झाली असल्याने त्यांना बाजूला करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान एका लेनवरून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. निगडी वाहतूक पोलीस घटनास्थळी हजर आहेत.

 

Nigdi : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

घटनास्थळी असलेले पोलीस उपनिरीक्षक संभाजी राऊत यांनी सांगितले की, पवळे उड्डाणपुलावरून खाली येत असताना टँकर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्याच्या पाठीमागून येणारा कंटेनर टँकरला धडकला. कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.

 

या अपघातात दोन्ही वाहने लॉक झाली आहेत. लॉक झालेली वाहने संगणक आधारित सिस्टीमद्वारे अनलॉक करावी लागणार आहेत. त्यासाठी मॅकेनिक बोलावण्यात आले असून दोन्ही वाहने बाजूला (Nigdi )घेण्याचे काम सुरु असल्याचेही उपनिरीक्षक राऊत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.